देशात २४ तासात ९६ हजार ४२४ नव्या रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसापासून ९० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात ११७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ३७२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात सध्या ५२ लाख १४ हजार ६७८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये १० लाख १७ हजार ७५४ अॅक्टिव्ह केसेस असून ४१ लाख १२ हजार ५५२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.