देशात २४ तासांमध्ये ३८१ कोरोनाग्रस्त झाले पूर्णपणे बरे

0

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1396 रुग्णांची वाढ झाली असून यामुळं देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27,892 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारी आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन वार्तालापाद्वारे देण्यात आलीये.


दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशातील 381 कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 6184 एवढी झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचा दर) 22.17%  एवढा असल्याचं देखील आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.