नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात 62 हजार 224 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधितांच्या संख्येत दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर एका दिवसात 2 हजार 542 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने दिलासाही आहे.
गेल्या 24 तासात 1 लाख 7 हजार 628 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 वर गेला आहे. देशात 2 कोटी 83 लाख 88 हजार 100 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 79 हजार 573 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 8 लाख 65 हजार 432 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 26 कोटी 19 लाख 72 हजार 14 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासात 28 लाख 458 जणांना लसीकरण करण्यात आले.

