मुंबई : कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. देशात गुरुवार सकाळपर्यंत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २१ हजार ३९३ वर पोहोचला. आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत कोरोनामुळे ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १६ हजार ४५४ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ४ हजार २५७ रुग्ण कोरोनावर मात करुन पूर्णपणे बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
दरम्यान, भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आढळली आहे. राज्यातील आकडा ६ हजार ७१० वर पोहोचला आहे. आतापर्यंत ७८९ रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत तर २६९ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. महाराष्ट्रपाठोपाठ गुजरात आणि दिल्लीत कोरोना विषाणूच्या बाधितांची संख्या अधिक आहे. गुजरातमध्ये सध्या २ हजार ४०७ रुग्ण आहेत तर दिल्लीत ही संख्या २ हजार २४८ वर पोहोचली आहे.