देशात कोरोनाचा हाहाकार : दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने ओलांडला २ लाखाचा टप्पा

0

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी २ लाखाचा आकडा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. दररोज सरासरी १० ते १५ हजार रुग्णांची भर पडत आहे.

गुरुवारी दिवसभरात सापडलेल्या रुग्णांसह कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात ११८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७४ हजार ३०८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

सध्या देशभरात १५ लाख ६९ हजार ७४३ लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. तसेच आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६ कोटी ३४ लाख ७६ हजार ६२५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

गुरुवारी दिवसभरात १४ लाख ७३ हजार २१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) प्रसिद्ध केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.