नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही नियंत्रणात नसल्याचीच जाणीव करून देणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत 75 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून येत होते. 1 सप्टेंबर रोजी 6 दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली, मात्र आज पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांत 78 हजार 357 नवीन रुग्ण सापडले आहे. तर, 1045 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नव्या रुग्णांमुळे देशातील करोना बाधितांची एकूण संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ इतकी झाली आहे. म्हणजे ३८ लाखांच्या उंबरठ्यावर हा आकडा पोहोचला आहे. यात ८ लाख १ हजार २८२ रुग्ण सध्या देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर २९ लाख १ हजार ९०९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत करोनामुळे ६६ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.
How to procedure of fill the application