नवी दिल्ली : देशात सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून १ हजार १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाखांच्या पार गेली आहे.
दरम्यान, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५१ लाख १८ हजार २५४ इतकी झाली आहे. तर देशात सध्या १० लाख ९ हजार ९७६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४० लाख २५ हजार ०८० जणांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ८३ हजार १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.