नवी दिल्ली : देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 93,337 नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 1,247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रोजच्या वाढत्या आकडेवारीमुळे देशात कोरोनाची एकूण आकडेवारी 53,08,015 इतकी आहे तर यामध्ये 10,13,964 इतके अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 42,08,432 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे झाले आहेत तर आतापर्यंत 85,619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरस थांबवण्याचं काही नाव घेत नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमित रूग्णांचा आलेख वेगाने वाढत आहे. दररोज कोरोनाचे 90 हजाराहून अधिक केसेस समोर येत आहेत.
विशेष म्हणजे कोरोनामुळे आतापर्यंत 43 लाख 8 हजार 431 लोक बरे झाले आहेत हीच दिलासाची बाब म्हणावी लागेल. आयसीएमआरच्या मते, गेल्या 24 तासात देशात 8,81,911 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 6,24,54,254 लोकांची कोरोना चाचणी केली गेली आहे.