देशात करोनाबाधितांची संख्या ४४२१ वर, ११४ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली :  देशभरात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असून करोनाबाधितांची संख्या ४४२१ वर पोहोचली आहे. तर या व्हायरसमुळे ११४ जणांचा आतापर्यन्त मृत्यू झाला आहे  दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे ३८१ रुग्ण आतापर्यन्त बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ४४२१ वर करोनाबाधितांपैकी 3851 सक्रिय रूग्ण असून त्यापैकी 1445 रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८८६ झाली आहे. यात एकट्या मुंबईत करोनाचे ५२६ रुग्ण आहे.महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक 45 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर गुजरातमध्ये 12, मध्य प्रदेशात 9, तेलंगणा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी 7, पंजाबमध्ये 6 आणि तामिळनाडूमध्ये 5 मृत्यू झाले.

दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचे 523 रूग्ण आहेत. आतापर्यंत 523 रूग्णांपैकी 330 रूग्ण मरकजचे आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने 1 लाख टेस्टिंग किट्स ऑर्डर केले आहेत. हे किट्स शुक्रवारी मिळणार आहेत. केंद्र सरकारद्वारे दिल्लीला 27000 व्यक्तिगत सुरक्षा किट्स (PPE) मागवले आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 25 वर पोहचला आहे. यातील 21 जण हे तबलिगी जमातवरून परतलेले व त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. मागील चोवीस तासांत चार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील तीन जण मरकजला जाऊन आलेल्यांच्या संपर्कात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.