देशात करोनाग्रस्तांची संख्या २९ हजाराच्या वर

0

नवी दिल्ली : कोरोनाचे जाळे देशभरात दिवसेंदिवस वेगाने पसरत चालले आहे. गेल्या २४ तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, देशभरातील रुग्णांची संख्या २९ हजारांच्या वर पोहोचली आहे.

लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलं आहे. मात्र, आता देशासमोर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ठाकली आहे. दरम्यान, देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे ३ मे नंतर या जिल्ह्यांना लॉकडाउनपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सोमवारी झालेल्या बैठकीत तशी चर्चा झाली आहे. यात लॉकडाउन हटवण्यासंदर्भात राज्यांनी निर्णय घ्यावा, असं केंद्रानं म्हटलं आहे.

दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सोमवारी ५२२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५९० इतकी झाली आहे. यापैकी १२८२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. उपचारासाठी तीन हजार व्हेटिंलेटर, ८० हजार पीपीई किट्स आणि २ लाख ८२ हजार मास्क राज्य सरकारकडे सध्या उपलब्ध आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.