देशातील १३ राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा

0

नवी दिल्ली -देशातील 13 राज्य आणि दोन केंद्रशासिल प्रदेशांमध्ये सोमवारी जोरदार वादळाची आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हवामान विभागाच्या अंदाजावरून हा इशारा देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून हरियाणात 7 आणि 8 मे रोजी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुटी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश आणि राजस्थान सह सुमारे 14 राज्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे 125 हून अधिक लोक मारले गेले होते.
या राज्यांमध्ये जोरदार पाऊस
आसाम, मेघालय, नगालंड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम राजस्थानात वादळी वारे येण्याचीही शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.