देशाच्या अर्थव्यवस्थेची नुकसान भरपाई कोण करणार?

0

नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच आता यावर नीति आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर सरकारवर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. दरम्यान, आता या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जे देशाचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई कोण देणार आहे, असा सवाल कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे.

नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देशात भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचे प्रमाण नोटबंदीमुळे वाढले असल्याचे सांगितल्यानंतर सरकारच्या आर्थिक नियोजनावर सर्व स्तरातून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच कॉंग्रेसनेही सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी नीति आयोगाने देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्‍त केली असून याला जबाबदार सरकार असून याची उत्तरे सरकारने द्यावीत असे म्हटले आहे. तसेच सरकारने देशातील जनतेला देशाच्या अर्थव्यवस्थेची ही अवस्था का झाली याविषयी स्पष्टीकरण द्यावे तसेच देशातील बेराजगारीचे प्रमाण का वाढले आणि रुपयाचे मुल्य का घटत चालले आहे हेदेखील स्पष्ट करावे असे म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.