देशभरात करोना रुग्णांचा आकडा १९०० वर

0

मुंबई : देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत देशभरात करोना रुग्णांचा आकडा १९०० वर पोहोचला असून मृतांचा आकडा ५५ वर पोहोचला आहे.  ह्या वाढत्या प्रादूर्भावाला निजामुद्दीन तबलीगी जमातीची दिल्लीत झालेली परिषदही काही अंशी जबाबदार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

या परिषदेतील जवळपास 8 हजारहून अधिक लोक 22 राज्यांमधील वेगवेगळ्या भागांत गेले होते. त्यापैकी 6 हजार लोकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १९०० वर आहे.

यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 33 नव्या केसेस आढळल्यानं 335 वर संख्या पोहोचली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतूनच 30 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीती आहे. 24 तासांत मुंबईत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.