देशभरात आज 20 मिनिटासाठी पेट्रोल पंप बंद
मुंबई : सीआयपीडीचे देशभरात आज पेट्रोल पंप संध्याकाळी 20 मिनिटासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्याचा निषेध आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशातील 56 हजार पेट्रोल पंप संध्याकाळी 7 ते 7.20 दरम्यान बंद राहतील. पुवलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून पेट्रोल पंप संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान शहिदांचे पेट्रोल पंपवर फोटो आणि बॅनर लावण्यात येणार आहे, तर लाईट बंद ठेवून शहिदांना आदरांजली वाहण्यात येईल, असे सीआयपीडीचे प्रभारी महासचिव सुरेश कुमार यांनी सांगितले. तसेच 20 मिनिटे पेट्रोल पंप बंद ठेवून कोणतेही काम केले जाणार नाही, लोकांनी आम्हाला सहयोग करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीफचे ४० जवानांना वीर मरण आले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडे होती. हा हल्ला आत्मघातील हल्लेखोर आदिल अहमदद डार याने केला. या हल्ल्याचा सध्या संपूर्ण भारताततून निषेध केला जात आहे.