अधिवेशनादरम्यान कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांचा हेतू जनतेसमोर मांडणार
जळगाव ;- अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करून नंतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेचे कामकाज ठप्प केले . कुठलेही कामकाज होऊ द्यायचे नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती . जनतेच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतला जात नाही . त्यामुळे हि बाब जनतेसमोर यावी म्हणून भाजपाचे देशभरातील खासदार आपापल्या मतदारसंघात येत्या १२ एप्रिल रोजी एक दिवसीय उपोषण करणार असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी आज वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली . यावेळी आ. राजूमामा भोळे , माजी जिल्हाध्यक्ष सुभाष शौचे , विशाल त्रिपाठी,सुनील माळी , नवनाथ दारकुंडे , मनोज भांडारकर आदी उपस्थित होते .
शिवतीर्थ मैदानावर उपोषणाला बसणार
संसदेत विरोधक कामकाज ठप्प पाडतात यासाठी जनतेसमोर भाजपाचे सर्व खासदार उपोषण करणार असून खा. पाटील हे जळगावातील शिवतीर्थ मैदानावर उपोषणाला बसणार आहेत . त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे खासदार एटी पाटील यांनी यावेळी सांगितले .

