देवेंद्र फडणवीसांवरील खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

0
20

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर नागपूर न्यायालयाने आज देवेंद्र फडणवीस विरोधातील सुनावणी पुढे ढकलली आहे. दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले असून पुढील सुनावणी 4 जानेवारीला होणार असल्याचे सांगितले आहे.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी या प्रकरणाची नागपूर सत्र न्यायालयातील सुनावणी सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता.  या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. यानंतर सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नागपूरच्या न्यायालयाला खटला चालू ठेवण्याचे आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here