देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार ! पहिली स्वाक्षरी ‘या’ कामासाठी

0

मुंबई :  आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला.


शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही ठोकली. ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. तर फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे. दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.