देवेंद्र फडणवीसांनी मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयातील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. दरम्यान आज सकाळी मुक्ताईनगर येथे आल्यानंतर त्यांनी कोथळी येथे खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतली. यानंतर ते उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले.

यावेळी या हॉस्पीटलमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डॉक्टर्स व अन्य कर्मचार्‍यांसह काही रूग्णांशी संवाद देखील साधला. याप्रसंगी त्यांच्या सोबत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.