Sunday, May 29, 2022

देवा पेरवी यांचे पत्रकारितेतील योगदान उल्लेखनीय – खा. सुनील तटकरे

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक चॅनेलमधून गोरगरीब पीडितांना न्याय मिळवून देणारे पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष, पेण येथील पत्रकार देवा पेरवी यांचे पत्रकारितेतील योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे ग्रामीण पत्रकार असोसिएशनच्या दशकपूर्ती पुरस्कार सोहळा वितरण समारंभात काढले.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक लिखाण करून देवा पेरवी यांनी पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नागोठणे ग्रामीण पत्रकार असोसिएशनने त्यांना माझ्या हस्ते रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देवा पेरवी यांच्या पुढील वाटचालीस आमदार महेंद्र दळवी यांनीही शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी मुंबई येथील रवींद्र माहिमकर यांना तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार तर खेड येथील चंद्रकांत बनकर यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून ” संकल्प ” या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, शिवसेना सल्लागार व राजिप सदस्य किशोर जैन, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, मनसेचे गोवर्धन पोलसानी, नरेंद्र जैन, नागोठणे पत्रकार असोसिएशनचे संस्थापक श्यामकांत नेरपगार, अध्यक्ष महेश पवार, उपाध्यक्ष धम्मशील सावंत, अनिल पवार, किशोर कदम, राजू जोशी, विनोद भोईर, सुनिल कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, राजेश पिंगळे, सचिन नेरपगार यांच्यासह मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या