किनगाव प्रतिनिधी (जाकेर कुरेशी) :

अहमदपूर तालुक्यातील किनगांव जवळच असलेल्या देवकरा गावाच्या शिवारात संध्याकाळी विचिञ घटना घडली आहे.या गावातील प्रभाकर विनायक मुरकुटे या शेतकऱ्याची विहीर खोदण्यास पोकलेन – (जे.सी.बी) आली होती.पोकलेनचा भीषण स्फोट झाला.त्याचे सर्व लोखंङी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उङाले.पोकलेनचे उङालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर विनायक मुरकुटे व दहिफळे बाबूराव पांङूरंग याच्या अंगावर पङले.या अपघातात या दोघाच जागीच मृत्यू झाला.व भगतराज नारायण सारेआम हे जखमी झाले असून त्यांना शासकीय दवाखाना अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे.पोकलेनला भीषण आग लागली होती.मोठा आवाज ऐकुन लोक घटनास्थळी धावले.घटनेची माहिती किनगांव पोलिस स्टेशनला मिळताच तात्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाङीस पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रक मिळवले.
सविस्तर वृत असे की,देवकरा गावाजवळ शेतकरी प्रभाकर विनायक मुरकुटे यांच्या शेतात – विहीर खोदण्याकरीता पोकलेन ( जेसीबी ) दि. १८.०४.२०२१ संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान शेतातील विहीर खोद कामासाठी जात असतांना तीचा आचणक स्फोट होऊन शेतकरी प्रभाकर विनायक मुरकुटे वय ६३ रा. देवकरा व दहीफळे बाबुराव पांडूरंग वय ६८ रा.कोळवाडी हे जागीच ठार झाले असून जेसीबी अॅपरेटर (चालक) .भगतराज नारायण सारेआम रा. चिलखा ( मध्य प्रदेश) हे जखमी झाले असून त्यांना शासकिय दवाखाना अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे. फिर्याद श्रीकृष्णा प्रभाकर मुरकुटे वय ३८ धंदा.शेती.यांनी दिल्यानुसार दि. १९.०४.२०२१ रोजी किनगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पो.हे.का तोपरपे यांच्याकडे देण्यात आला आहे.या घटनास्थळी.DYSP- जॉन डॅनियल बेन,जि.प.सदस्य अशोक केंद्रे,माजी जि.प.सदस्य त्र्यंबक गुट्टे यांनी भेट दिली.
दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घङली पोकलेनसारख्या वाहनाचे पार्ट हवेत उङून कसे गेले?याबाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत.आवाज मोठा असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने घटनास्थळी जमले होते.अचानक घङलेल्या या विचिञ अन् भीषण अपघातामुळे गावातील नागरिकांमध्य काही काळासाठी भितीचं वातावरण पसरलं होत.

