Wednesday, August 17, 2022

दूधसागर धबधबा ट्रेनवर असा कोसळला की निम्मी ट्रेन झाली गायब (व्हिडीओ)

- Advertisement -

या पावसाळ्यात अतिवृष्टी (मुसळधार पाऊस) ने महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, कोकण रेल्वेकडून पावसाळ्याची काही सुखद दृष्येही समोर आली आहेत. मंगळवारी दक्षिण पश्चिम रेल्वेची गाडी प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरून जात होती. पावसामुळे ट्रेन धबधब्याजवळ थांबली होती. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा येथे एक अतिशय सुंदर दृश्य दिसलं.

- Advertisement -

सध्या दूधसागर परीसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दूधसागर धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. आता या धबधब्याचे पाणी एका ट्रेनवर कोसळताना दिसून येत आहे. या धबधब्यामुळे अर्धी ट्रेन गायब झाली आहे. पावसामुळे धबाधबा ओसंडून वाहत आहे, त्यामुळे या ठिकाणाहून जाणारी रेल्वे रोखण्यात आली आहे. ही अर्धी ट्रेन दूधसागरमधून पार होत असताना थांबवण्यात आल्यामुळे दूधसागरचा वर्षाव तिच्यावर होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये हा दूधसागर धबधबा आहे. गोव्यातील मांडोवी नदीवर हा धबधबा आहे. देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असणाऱ्या या धबधब्याची उंची ३१० मीटर आहे, तर रुंदी३० मीटर आहे.

सध्या या धबधब्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पावसाळ्यात अद्भुत दृष्य दाखवणारा हा धबधबा जगभरात प्रसिद्ध आहे. चित्रपटांमध्येही हा धबाधबा दिसून आला आहे. शाहरुख खानच्या चैन्नई एक्सप्रेममध्येही हा धबधबा दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या