राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांचा आरोप
जळगाव दि. 17
दुष्काळावर मात करण्यासाठी शासन, प्रशासन अपयशी ठरत आहे. गावागावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त टँकर सुरु करावे. गुरांच्या चार्यााची समस्या सोडवाव्या. शेतकर्याांना मोफत बियाणे द्यावे, विविध समस्या 7 दिवसात सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात लोडशेडींगमुळे पाण्याचे टँकर भरण्यास अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनातर्फे बोअरवेल करण्यात येतात. परंतु ते फक्त 200 ते 250 फूट असतात. परंतु भूजलपातळी खूपच खालावली आहे. आता पावसाळा जवळ आला आहे. जलजन्य, साथरोगांपासून बचाव करण्यासाठी टिसीयल पावडर टाकून पाणी पुरवठा व्हावा. अनेक गावांमध्ये दुष्काळी कालावधीतही तलाठी, ग्रामसेवक आदी नाही. जिल्हा परिषद अकार्यक्षम ठरत आहे. कर्जमाफीचा घोळ सुरुच आहे. शेतकर्याांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी करावी गुरांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. दुष्काळी अनुदान अद्याप बर्यााच शेतकर्याांच्या बँकेच्या खात्यात जमा झाली नाही. पीक विम्याचा लाभ व केळीची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही, असा आरोप रवींद्र पाटील यांनी केला.
पालकमंत्री गायब
दुष्काळी स्थिती लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात थांबून टंचाईवर मात करणे आवश्यक आहे. पण, त्यांना जिल्ह्यात यायला वेळ दिसत नाही ते फक्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टिका करण्यात समाधान मानतात, असा आरोपही पाटील यांनी केला. पालकमंत्र्यांनी त्वरीत आढावा घेऊन दुष्काळी उपाययोजना राबवावी. यावल, रावेर भागातील केळी संकटात आहे. हतनूर धरणातील जलसाठा फक्त दोन टक्क्यावर आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास दुष्काळाची स्थिती गंभीर होईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दुष्काळी परिषदेसाठी प्रयत्नशिल असल्याचेही अॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महानगराध्यक्ष, नामदेव चौधरी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला महानगराध्यक्ष नीला चौधरी, सविता बोरसे, मीनाक्षी चव्हाण, ममता तडवी, अक्षय चौधरी, पिनाझ फनीबंद, अक्षय चौधरी प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार आदी उपस्थित होते.