भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील टाळावेत शिवारातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे . दुचाकींचा नंबर बदलवून तिचा वापर होत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
याबाबत सूत्रांची माहिती अशी कि , साधारण वर्षभरापूर्वी तळवेल गाव शिवारातून मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९, सी.एच. ४४२६) ही चोरीला गेली होती. याबाबत वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या बाबत गुप्त माहिती मिळाली होती की, ही मोटरसायकल चोरणारा भुसावळात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील न्यु आंबेडकर नगर येथे एका संशयितास पकडून विचारपूस केली. पोलीस चौकशीत त्याने त्याचे नाव आदर्श बाळू तायडे उर्फ गोल्डन डप्ली (वय-२३,रा.न्यू आंबेडकर नगर, चांदमारी, भुसावळ) असे सांगितले. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने कबूल केले की, एक वर्षापूर्वी तळवेल गाव शिवारातून त्याने आणि त्याचा साथीदार सागर बबन मुसळे (रा.कंडारी) तसेच अलीम शेख अखिल (वय-१९,रा.कंडारी) अशा तिघांनी मिळून चोरी केली होती. त्यानंतर या मोटरसायकलची मूळ नंबर प्लेट बदलून त्यावर (एम.एच.१९,सी.एस. ८५६५) असा नंबर बदली केला होता. तसेच त्यानंतर साधारण तीन ते चार महिन्यापूर्वी भुसावळातमधील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये रात्री ही मोटरसायकल बेवारस स्थितीत सोडून निघून गेले होते. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघां आरोपींना अटक केली असून पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Trending
- दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
- ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
- 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
- कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
- अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
- दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
- हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
- दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

