दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

0

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून घरासमोरुन दुचाकी चोरणारा सराईत चोरटा सुभाष ममराज राठोड (वय ४०, रा. खेळगाव तांडा, ता. एरंडोल) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

शहरातील सिंधी कॉलनीत राहणारे रवी वासुदेव कुकरेजा यांची (एमएच १९ डीसी ८८२४) क्रमांकाची दुचाकी दि. ३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरुन चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी सराईत रेकॉर्डवरील चोरटा सुभाष राठोड याने चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे यांचे पथक रवाना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.