Monday, September 26, 2022

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरुणाचा मृत्यू तर दुसरा जखमी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

तरुणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात होवून जागीच मृत्यू झाला तर चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना आज पळासखेडा ते विटनेर दरम्यान येथे सकाळी घडली.

- Advertisement -

- Advertisement -

साहिल विष्णू आराख (वय २४ रा. खुबचंद साहित्या अपार्टमेंट, जळगाव ) असे मयत झालेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे.  सोबत असलेला चुलत भाऊ संदेश अशोक आराख (वय २२ रा. समतानगर जळगाव) हा जखमी झाला आहे.

साहिल आराख हा  आज मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी समतानगरातील चुलत भाऊ संदेश आराख याच्या सोबत दुचाकी क्रमांक ( एम.एच २८ ५७५३) ने सोयगाव येथे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होते. यादरम्यान पळासखेडा मिराचेजवळ शिवढाबा या हॉटेलसमोर दुचाकीस्वार साहिल याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले.

यात गाडी पूलाखाली कोसळण्यापूर्वी दुचाकीस्वार साहिल व मागे बसलेला संदेश या दोघांनी दुचाकीवरुन उडी मारली. गाडी पूलाखाली कोसळली तर उडी मारल्यानंतर रस्त्यावरील दगडावर डोके आपटल्याने गंभीर दुखापत होवून साहिल जागीच ठार झाला तर संदेश जखमी झाला आहे.

साहिल यास जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांची जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला होता. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या