दुचाकीने घरी जात असताना रस्त्यातच अज्ञातांचा दांपत्यावर प्राणघातक हल्ला

0

जळगाव : कानळदा रोडवर दुचाकीने पती-पत्नी घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी चॉपरने प्राणघातक हल्ला घटना आज घडली.  योगेश गोपाळ साळी व प्रिया योगेश साळी हे दोघे रा. शिवाजी नगर असे हल्ला केलेल्या दांपत्याचे नाव असून यात जखमी पतीस जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

योगेश साळी व पत्नी प्रिया हे दोघे पती-पत्नी शहरातील शाहू महाराज हॉस्पिटलमधून उपचार घेऊन राधाकृष्ण मेडिकलवरून गोळ्या औषधे घेऊन कानळदा रोडने दुचाकीने घरी जात होते.  घरी जात असतांना रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर दारूची काचेची बाटली अंगावर फेकून मारली. दुचाकी थांबून पाहिले असता अज्ञात हल्लेखोरांनी जवळ येऊन काही न सांगता योगेश साळी याच्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेशच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून प्रिया साळी याची देखील मारहाण केली. दोघजण याला प्रतिकार केला असता अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली व घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत योगेश व त्याची पत्नी प्रिया हे दोघे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. दरम्यान व्यवसायाच्या भागीदारीतून हा हल्ला झाला संशय योगेश व त्याच्या पत्नी प्रिया यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.