दुचाकीधारकाला लोखंडी सळईने मारहाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील रेडक्रॉस सोसायटीजवळ दुचाकीने जणाऱ्या तरूणाला चौघांकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.  याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील पिंप्राळा भागातील वेल्डिंग कामगार जावेद सिकंदर पिंजारी (वय २८) हा तरुण शुक्रवारी रेडक्रॉस सोसायटी जवळील रस्त्याने त्याच्या (एमएच १९ एएफ ८०१५) या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. यादरम्यान अचानक डिव्हायडर ओलांडून जावेदच्या दुचाकीसमोर एक अनोळखी तरुण आला.

दुचाकीसमोर आलेल्या तरूणाला जावेद तुला दिसत नाही का असे बोलला असता त्याचा राग आल्याने त्यात तरूणांसह आणखी इतर तीन जणांनी जावेदसोबत वाद घातला तसेच तिघांनी त्याला पकडून ठेवले. तर एकाने लोखंडी पट्टी सह लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करून दुखापत केली.

त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत जावेद हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गवारे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.