Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दुचाकींची समोरासमोर धडक होवून दोन ठार तर एक जखमी
    जळगाव जिल्हा

    दुचाकींची समोरासमोर धडक होवून दोन ठार तर एक जखमी

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 9, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यातील शेंदुर्णी जवळ दुचाकींची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दीपक रामदास गायकवाड (वय ३०, रा.घाटांब्री ता.सिल्लोड जि. औरंगाबाद) व दिनेश मदन जाधव (वय २३, रा गोंदेगाव तांडा) अशी मयतांची नावे आहेत. तर या अपघातात कृष्णा उत्तम सोनवणे रा. डकला.ता.सिल्लोड हा जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारार्थ खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

    दीपक गायकवाड हा मित्र कृष्णा सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने रविवारी त्याची जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील बहीण राधाबाई हिच्या भेटीसाठी गेला होता. तेथून परतत असताना शेंदुर्णी गावाजवळ समोरून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात दीपक याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा हा जखमी झाला आहे. तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दिनेश मदन जाधव या तरुणाचाही मृत्यू झाला आहे. दोघे मयतांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

    मयत दीपक यांच्या पश्चात आई सुशिलाबाई , वडील रामदास पांडुरंग गायकवाड , दोन भाऊ करण व दत्तु, ३ विवाहित बहिणी, पत्नी उषाबाई, तीन मुले गणेश , निलेश व दिनेश व मुलगी निकिता  असा परिवार आहे. अपघात झाल्यानंतर त्यांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

     

    Accident News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif