Wednesday, September 28, 2022

दुःखद.. चार वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळील भोकरी येथील अलिजा इम्रान कांकर (वय ४) ही आपल्या आई सोबत झोपली असतांना रात्री झोपेतच तिला विषारी सापाने चावा घेतल्याने तिचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सोमवारी सकाळी चार वाजेच्या सुमारास अलिजा ही झोपली असतांना तिला काहीतरी चावल्याचे भास झाला म्हणून ती झोपेतून उठून बोबड्या आवाजात आईला सांगू लागली की, “भैय्या मुझे काट रहा है” असे सांगितल्यावर त्याच्या आईवडिलांनी उठून पाहिले असता, तिच्या जवळ दोन साप आढळून आले. त्यापैकी एका सापाने अलिजा हिच्या गळ्याजवळ चावा घेतलेला दिसून आला. ही घटना पाहताच कुटुंबीयांची दातखीळ बसली व आरडाओरडा करुन मदतीसाठी धावा केला.

हा गोंगाट ऐकून भोकरी गावातील शेजारी मदतीसाठी धावले. समोर पाहिले असता अलिजा हिच्या अंथरुणावर दोन साप आढळून आले, त्यापैकी एका सापाने अलिजा हिच्या गळ्याजवळ घट्ट चावा घेतलेला होता. आता याच्यावर काय करावे म्हणून त्यांनी गावातील सर्पमित्राला बोलून साप पकडण्यासाठी विनंती केली. एका बाजूला साप पकडणे सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला अलिजावर उपचार करण्यासाठी धावपळ सुरू होती.

परंतु नशिबाला वेगळेच काही मान्य होते तिच्यावर उपचार करण्याची धावपळ सुरू असतांनाच सर्प विषारी असल्यामुळे तिचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली केली जात असून भोकर व वरखेडी येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या