भुसावळ प्रतिनिधी
दीपनगरातील अॅश ट्रान्सपोर्टर व्यावसायीकावर त्याच व्यवसायात कार्यरत असलेल्या दुसर्या एका कंत्राटदाराने गावठी कट्टा रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास घडली.
कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी व ट्रान्सपोर्टर दीपक मधुकर हतोले यांच्यात असलेला व्यावसायिक वाद चीघळला असून सदर वाद विकोपाला गेल्याने संतापात ट्रान्सपोर्टर दीपक मधुकर हतोले (38) यांनी तिवारी यांचे घरात घुसुन वाद केला यावेळी हतोले याचे जवळ गावठी कट्टा होता मात्र दोघांमध्ये झालेल्या झटापटीत गोळी न चालल्याने कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी हे बचावले. या घटनेने दीपनगरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
घटनास्थळी डि.वाय एस .पी. गजानन राठोड सह पोलिस कर्मचारी व अधिकारी त्वरित दाखल झाले . घटनेनंतर ट्रान्सपोर्टर दीपक मधुकर हतोले (38) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.