दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला रायसोनी महाविद्यालयात पतंग उडवण्याचा आनंद

0

जळगाव : उडी उडी जाय, पतंग तेरी उडी उडी जाय‘ म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत गीत व संगीताच्या तालावर ठेका  “उडाण” संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तसेच जळगावकर नागरिकांनी युवाशक्ती फौंडेशन आयोजित पतंगोत्सवात खेळीमेळीच्या वातावरणात जी.एच.रायसोनी महाविद्यालयातील मैदानावर  ठेका धरला. क्षणाक्षणाला पतंग उडवण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

 

मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने युवाशक्ती फौंडेशन, जी.एच.रायसोनी महाविद्यालय आणि उडाण संस्थेच्या वतीने पतंगोत्सव मंगळवारी घेण्यात आला. यावेळी रायसोनी इन्स्टीट्यूटच्या संचालिका आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. प्रीती अग्रवालकार्यकारी संचालक प्रीतम रायसोनीयुवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीयाउडाण संस्थेच्या संचालिका हर्षाली चौधरीमल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा, युवाशक्तीचे सचिव अमित जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पतंग महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, पतंगोत्सवात दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष आहे. जीवनात उत्साह आणण्यासाठी पतंगोत्सव महत्वाचा ठरत आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला धार्मिक व खगोलीय महत्वसुद्धा आहे.

 

उडाण फाउंडेशनमधील दिव्यांग मुलांनी तयार केलेले पतंग यावेळी उपस्थितांना मोफत वाटप करण्यात आले. या वेळी उडाण संस्थेच्या ६८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी मनसोक्त पतंग उडवत “काय पो छे”, “ढील ढील दे दे रे” अशा विविध गीतांवर नृत्य करून आनंद लुटला. त्यांचेसोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी देखील उपस्थिती दिली. प्रसंगी सेल्फी पॉईंटवर पतंगामध्ये देखील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत उत्साह दाखविला.

 

नायलॉन व चायनीज मांज्यावर बंदी असल्यानेआयोजकांतर्फे खास पुण्यातून दोर्‍यापासून तयार केलेला मांजा उपस्थिताना पुरवण्यात आला. या ठिकाणी तिळगुळही उपस्थितांनी एकमेकांना वाटप केले. प्रा.राज कांकरियाप्रा मकरंद वाठप्रकाश शर्मा, युवाशक्ती फौंडेशनचे सदस्य उमाकांत जाधवप्रशांत वाणीसागर सोनवणे, विनोद सैनी, सौरभ कुळकर्णी, नवल गोपाळ, राहुल चव्हाण, मयूर जाधव, पियुष हसवाल, मनजित जांगीड, आकाश धनगर यांचेसह आयएमए संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.