पिंपळगाव हरेश्वर (वार्ताहर) : पिंपळगाव हरेश्वर येथील दिव्यांग बंधू भगिनींच्या हकका साठी ग्रामपंचायत अधिकारात असलेला विषय पाच टक्के निधी खर्च व्हावा दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्रामसेवक बी एस पाटील यांना विकास लोहार अनुलोम पाचोरा राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष यांचे हातून निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित दिव्यांक बंधू भगिनी सविता पाटील, दशरथ भडांगे, प्रकाश बडगुजर,रवींद्र वाणी,गणेश माळी,सुनील लोहार,भारत वाघे शेख शोएब शेख युनूस ग्रामपंचायत सदस्य अंतिम महाजन,बबलू पाटील,राहुल बडगुजर पाटील आदी मंडळी उपस्थित होते



