फैजपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजने अंतर्गत 35 किलो धान्य मिळणार असा जी.आर.अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ सो यांनी काढला असून महाविकास आघाडी सरकारने दिव्यांग बांधवांना न्याय दिला फैजपूर डॉ.सुभाषचंद्र बोस यांचे पुतळ्या जवळ सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन आघाडी सरकारचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे सो, अन्नपुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ सो, व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री श्री.मा. गुलाबरावजी पाटील सो यांच्या अभिनंदनाचा ठराव करून फटाके फोडून दिव्यांग बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.
या प्रसंगी फैजपुर न.पा.विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी गटनेता शे.कुरबान,कांग्रेस प्रसिद्धी प्रमुख गणेश गुरव सर दिव्यांग सेना शहर अध्यक्ष नितीन महाजन ता.अध्यक्ष नाना मोची सचिव मुन्ना चौधरी ,राष्ट्रवादी सा.आ. शहर अध्यक्ष अशोक भालेराव व दिव्यांग सेना कार्यकर्ते रियाज ,चेतन तळेले अन्सार आदी फैजपुर शहरातील दिव्यांग बांधव मोठ्य संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन गुरव सर यांनी केले.लवकरच फैजपुर शहरात कँम्पचे आयोजन करून अंत्योदय योजनेचे फॉर्म भरुन यावल येथे संबंधित विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.