जिल्हा परिषदेत मार्च एंडिंगच्या नावाखाली विजेची सर्रास उधळपट्टी !
* नाजनीन शेख *
जळगाव;- सध्या मार्च अखेरची लगबग सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सुरु असून जिल्हापरिषदेतही सुट्ट्या रद्द करून मार्च एंडिंगची कामे केली जात आहे . मात्र एकीकडे शासन विजेची बचत करण्याचा संदेश देत असताना दिव्याखाली अंधार या उक्तीसारखा प्रकार जळगावच्या जिल्हा परिषदेत आज गुरुवारी दिसून आला . सीईओ दिवेकर यांच्या दालनासहित इतर विभागांमधील पंखे लाईट सर्रास सुरु असल्याचे व तेथे कर्मचारी नसल्याचे चित्र दिसून आले . यामुळे अधिकारी कर्मचाऱयांची वीज बचतीबाबत उदासीनता दिसून आली असून विजेची सर्रास उधळपट्टी होत असल्याचे दिसून आले . तर दुसरीकडे काम करताना ग्रामपंचायत विभागात कागदपत्रे जमिनीवर इस्ततः विखुरुन पडल्याचे पाहायला मिळाले .
मार्च एंडिंगची कामे सध्या सुरु असून ती त्वरित पूर्ण व्हावीत याकडे अधिकारी वर्गाचा कटाक्ष असल्याने कर्मचाऱयांना कामे उरकण्याचे आदेश देण्यात आले आहे . मात्र आज जिल्हा परिषदेत सुरु असलेली कामांबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता चित्र उलटच दिसून आले .
दिवेकर यांच्या दालनात दिवे सर्रास सुरु
जिल्हा परिषदेचे सीईओ दिवेकर यांच्या दालनात सर्रासपणे पंखे व दिवे सुरु असल्याचे पाहायला मिळाले . त्यामुळे एकीकडे शासन वीज वाचवा असा उपक्रम राबवित असताना जिल्हा परिषदेत मात्र उलटेच चित्र पाहायला मिळाले . दरम्यान अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांचेही दालन बंद दिसून आले . जमिनीवर कागदपत्रे विखरलेली
ग्रामपंचायत विभागात काही कर्मचारी कामे करताना आढळून आल्याने तेथेच टेबलाखाली जमिनीवर कागदपत्रे पडून असल्याचे दिसून आले . याशिवाय अनेक कर्मचारी जागेवर आढळून न आल्याने मगोलमालफ वातावरण पाहायला मिळाले . एकीकडे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळ येथे औष्णिक केंद्राचे उदघाटन करी त असताना दुसरीकडे मात्र विजेचा अपव्यय जिल्हापरिषदेत दिसून आला .