भुसावळ (प्रतिनिधी)- दिवाळीच्या सणात गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरसह गोरखपूरसाठी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाश्यानी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-नागपूर सुविधा विशेष गाडी वन वे फेरी
गाडी क्रमांक 82121 डाउन मुंबई-नागपूर सुविधा विशेष गाडी शुक्रवार व रविवारी 25 ऑक्टोबर व 27 ऑक्टोबरला मुंबईहून 12 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी नागपूरला दुपारी 3.10 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, चांदुर, धामनगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम, अजनी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
एलटीटी-गोरखपूर सुविधा एक्स्प्रेस (चार फेर्या)
गाडी क्रमांक 82119 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपुर सुविधा एक्स्प्रेस शनिवार, 19 ऑक्टोबर रोजी एलटीटीहून 5.10 वाजता सुटल्यानंतर रविवार, 12.45 वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 82120 अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस सुविधा विशेष एक्स्प्रेस रविवार, 20 ऑक्टोबर रोजी गोरखपूरहून 3.45 वाजता सुटल्यानंतर सोमवारी पाच वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचणार आहे.
नागपूर-एलटीटी विशेष गाडी
नागपूर-एलटीटी दरम्यान विशेष गाडी क्रमांक 01274 अप नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे गाडी गुरुवार, 17 ऑक्टोबर 19 को नागपूरहून चार वाजता सुटल्यानंतर शुक्रवारी 8.15 वाजता एलटीटीला पोहोचणार आहे. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धमनगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण, ठाणे आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.