Sunday, May 29, 2022

दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका !

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

सातत्याने वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा तयार फराळही यंदा महागला आहे. कोरोनाच्या फटक्यामुळे काटकसर करीत कसाबसा महिन्याचा खर्च भागविणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या खिशावर फराळ विकत घेताना चांगलाच ताण येणार आहे. डाळ, तेल, साखर या सर्वच जिन्नसांच्या किंमती वाढल्यामुळे तयार फराळाच्या दरामध्येही थोडी वाढ होणे अपेक्षित असल्याची भावना फराळाची ऑर्डर घेणाऱ्या महिलांनी व्यक्त केली असली, तरीही ग्राहकांना मात्र ही वाढ खिशावर अधिक भार टाकणारी असल्याचे वाटते आहे.

- Advertisement -

डाळ, तेल, तूप आणि चांगल्या प्रतीचा तांदूळ, स्वयंपाकाचा गॅस अधिक महागला आहे. त्यामुळे साहजिकच फराळाच्या किंमती वाढणार, असे तयार फराळाच्या ऑर्डर्स घेणाऱ्या स्वाती पाटील यांनी सांगितले. करोनामुळे सर्वसामान्यांचे बजेट यंदा कमी असणार याची कल्पना आहे. मात्र मागील दिवाळी करोना संसर्गाच्या धास्तीमध्ये गेली. यंदा रुग्णसंख्या कमी असल्यामुळे दिवाळीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. परिस्थिती हळूहळू सावरत आहे.

कार्यालये सुरू झाल्यामुळे, ज्यांना फराळ तयार करण्यासाठी वेळ नाही वा बाहेर फराळ पाठवायचा आहे, त्यांच्याकडून फराळाची आगाऊ नोंदणी केली जात आहे. तयार फराळासाठी प्रतिसाद चांगला मिळत असला, तरीही पूर्वी जे दोन ते तीन किलो भाजणीची चकली वा शंभर ते दीडशे नग करंज्यांची ऑर्डर द्यायचे, त्यांनी प्रमाणामध्ये कपात केल्याचा अनुभव फराळविक्रेते सांगतात.

प्रत्येक वर्षी किंमतीमध्ये तीन ते पाच टक्क्यांची वाढ असते. यंदा मात्र तेलाच्या तसेच डाळींच्या किंमती वाढल्यामुळे तसेच करोना संसर्गामुळे मदतनीसही मिळत नाहीत. ज्या महिला येतात त्यांना दिवसाच्या हिशेबाने पैसे द्यावे लागतात. ज्या जागी पूर्वी एकत्रित फराळ तयार केला जायचा, त्या जागांची भाड्याची रक्कम यंदा वाढली आहे. घरामध्ये मोठी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुरेशी जागा असतेच असे नाही.

असे आहेत यंदाचे साधारण दर

भाजणी चकली – ५०० रुपये किलो

खारे शंकरपाळे – ३५० रुपये किलो

गोड शंकरपाळे – ४०० रुपये किलो

साधी शेव- २७५ ते ३०० रुपये

लसूण शेव- ३०० ते ३२० रुपये

सुके खोबरे करंजी- २५ ते ३२ रुपये नग

चिवडा – ३५० ते ४०० रुपये किलो

सुक्या मेव्याचे लाडू – १२०० ते १५०० रुपये

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या