दिवसा वीज स्वस्त, रात्री महाग ! मोदी सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत

0

नवी दिल्ली : विजेचा वापर आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. वीजेचे दर हे एकच न ठेवता वेळेनुसार त्याचे दर ठरवण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. दिवसा विजेचा वापर हा कमी होतो आणि रात्री जास्त होतो त्यामुळे त्यांचे दर आता ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराघरात वीज पोहचण्यासाठी सरकारकडून हा पॉरव प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर लोडशेडिंगमुळे जर वीज गेली तर वीज वितरण कंपनीला दंड ठोठावण्याचाही विचार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाकडून लवकरच या प्रस्तावाला मंजूरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  दिवसा ग्राहकांना कमी दरात आणि रात्रीचे महाग अशा दोन टप्प्यात वीजेच दर ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशाच्या सर्व राज्यातील कंपन्यांना दिवसा सौरउर्जा वापरणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचाही प्रस्ताव आहे. ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत सौरऊर्जेचा वापर वाढवून सव्वा दोन लाख मेगावॅट करण्यात येणार आहे त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच या प्रस्तावानुसार सर्व वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांना 24 तास अखंडित सेवा देणे बंधनकारक असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.