दिल्ली हिंसाचार : आप नगरसेवकाच्या घरात सापडले पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच

0

नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील खजूरी येथे हिंसाचार भडवण्यामागे आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांचा हात होता? असा संशय केला जात आहे. कारण त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. त्यांच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये या घरातून सतत दगडफेक व पेट्रोल बॉम्ब येत होते.

गुप्तचर विभागाचे सहकारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी या घराच्या छतावर असलेल्या लोकांना शर्मा यांच्या कुटुंबीयांनी जबाबदार ठरविले आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. यासाठी पार्टीदेखील ताहिर हुसैन यांच्या बचावासाठी समोर आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.