नवी दिल्ली : नॉर्थ ईस्ट दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून दोनशेहून अधिक जण जखमी झाले आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत १०६ जणांना अटक केली असून १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हिंसाचारात नासिर आणि छेनू गँग सामील असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी इथल्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी १२ हून अधिक जणांना ओळखलंय. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि दिल्लीची जबाबदारी असणाऱ्या अजित डोवाल यांनी आपल्या अहवाल गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवलाय. अजित डोवाल यांनी मौजपूर आणि घोंडाचा दौरा करून स्थानिकांशी बातचीत केलीय. तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रभावित भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.