दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली.दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत.

२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व 70 जागांसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत 15 फेब्रुवारीपासून केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच दिल्ली विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आटोपता घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वातील आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत पाच वर्ष पूर्णपणे सत्ता राखली.

दरम्यान,  या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.