नवी दिल्ली :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. याशिवाय शहरात ७० हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा निर्णय लागू होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले कि, दिल्लीमध्ये महिलांच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना आहे. दिल्ली सरकारने महिलांना बस आणि मेट्रोमधील प्रवास निशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांना सार्वजनिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. महिलांना निशुल्क प्रवास देण्यासाठी डीएमआरसीचे होणारे नुकसान भरपाई दिल्ली सरकार देईल, असेही त्यांनी सांगितले आहे.