Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»दिल्लीत चार पैकी एक जण करोनाबाधित
    राष्ट्रीय

    दिल्लीत चार पैकी एक जण करोनाबाधित

    By July 22, 2020No Comments13 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली: देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत 23.48 टक्के नागरिकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीज असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. याचा अर्थ एवढ्या लोकांना करोना होऊन गेला आहे. यात सहभागी झालेल्या बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.

    बाधा झालेल्या अनेक जणांना करोनाची लक्षणेही दिसत नाहीत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणासाठी रक्‍ताचे एकूण 21 हजार 387 नमुने घेण्यात आले होते. देश या साथीच्या सावटाखाली सहा महिने आहे. मात्र, या कालावधीत केवळ 23.84 टक्के लोकांना करोनाची बाधा झाली आहे. यातील अनेक नमुने हे दाट लोकवस्तीच्या भागातील आहेत, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण दिल्ली सरकार, राष्ट्रीय साथ नियंत्रण केंद्र आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आले.

    यापूर्वी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आणि एनसीडीसी यांनी असा स्वरूपाचे सर्वेक्षण विनाप्रतिबंधित क्षेत्रातील 83 जिल्ह्यात घेतले होते. त्यातील 65 जिल्ह्यांमध्ये 0. 73 टक्के जणांना करोना होऊन गेला होता. अशा देशव्यापी सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे अलीकडेच सरकारने जाहीर केले होते.

    या सर्वेक्षणाचे निकाल पूर्ण तपशील हाती येईपर्यंत घाईने जाहीर करू नयेत, असा इशारा साथरोग तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषत: लोकसंख्येतील बाधितांचे प्रमाणाचा तपशील त्यासाठी आवश्‍यक आहे. या विषाणूची बाधा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राजधानीत होत आहे. तसेच त्याच्या प्रसाराला कोणतेही ठराविक प्रारूप नाही.

    राज्याच्या सर्व भागातही तो एक समान पसरला नाही. त्यामुळे संसर्गाची सरासरी एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून त्याकडे पाहता येईल, असे राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी, थिरूवनंतपूरम येथील तज्ज्ञ डॉ. लिपी जोसेफ यांनी म्हटले आहे.

    हे सर्वेक्षण दिल्लीच्या 11 जिल्ह्यांत 27 जून ते 10 जुलै या काळात घेण्यात आले. त्यावेळी सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना त्याची पूर्ण माहिती देण्यात आली होती. त्याची लिखित परवानगी घेण्यात आली होती. अँटीबॉडिजच्या तपासणीसाठी इलिसा टेस्ट किट वापरण्यात आले होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026

    ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif