दिल्लीत ‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, एक कार्यकर्ता ठार

0

नवी दिल्ली : दिल्लीतील मेहरौली विधानसभेचे आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात आपच्या अशोक नावाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा कार्यकर्ता हरेंद्र जखमी झाला आहे. नरेश यादव हे निवडून आल्यानंतर मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला.

आपचे खासदार संजय सिंह यांनी या घटनेची माहिती ट्विटरद्वारे दिली. गोळीबारात आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यकर्ते यादव यांच्यासोबत होते. ते सर्वजण मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला. या प्रकरणी किशनगढ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. बंदुकीतून चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती यादव यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.