दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला काॅंग्रेसचा पाठींबा ; ना.बाळासाहेब थोरात यांनी दिली माहिती

0

 खामगांव:– दि.3 डिसेंबर 2020 रोजी महाराश्ट प्रदेश काॅंग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथील काॅंग्रेस पक्ष कार्यालयात राज्यातील काॅंग्रेस पक्षाचे विधान सभा व विधान परिशदेचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वर्शभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच संघटनात्मक सुधारणांबाबत स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सहकार चळवळीबाबत चर्चा करण्यात आली. दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काॅंग्रेस पक्षाच्या वतीने पाठींबा देण्याचा ठराव बैठकीमध्ये मंजुर करण्यात आला.

तद्नंतर महाराष्ट काॅंग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या कृशी कायद्या विरोधात देशभरातील शेतक-यांमध्ये तीव्र संताप असुन या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला आहे. देशभरातील लाखो शेतकरी शेकडो किलो मिटर वरुन दिल्लीत पोहाचले. पण त्या शेतक-यांषी बोलायला सरकारकडे वेळ नाही. थंडीच्या दिवसामध्ये शेतक-यांवर थंड पाण्याचा मारा केला जात आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे. शेतक-यांच्या आंदोलनाला काॅंग्रेस पक्षाच्या वतीने पाठींबा देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. यावेळी उर्जामंत्री ना.नितीनजी राउत, ना.सतेज पाटील, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काॅंग्रेसचे नेते मंडळी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.