Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दिलासादायक ! २४ तासांमध्ये ‘या’ १० राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही
    ताज्या बातम्या

    दिलासादायक ! २४ तासांमध्ये ‘या’ १० राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

    By May 12, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात करोनाबाधितांची दिवसेंदिवस वाढत असताना गेल्या चोवीस तासांमध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्याचसोबत भारतातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिली.

    २४ तासांमध्ये या १० राज्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही
    अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगर हवेली, गोवा, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, ओडिशा, मिझोराम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. दीव-दमण, सिक्किम, नागालँड, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश व राज्ये आत्तापर्यंत करोनामुक्त राहिलेली आहेत.

    दिवसागणिक देशात करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.
    देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. तर आतापर्यंत करोनानं २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif