दिलासादायक ! बाधित रुग्णांपेक्षा आज कोरोना मुक्त झालेल्याची संख्या जास्त

0

जळगाव ।  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरू असून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र शुक्रवारी नविन कोरोना बाधितांची येणारी संख्या पेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र दिसून आले. आज दिवसभरात ११७६ जण कोरोना मुक्त होवून घरी गेले आहे. तर नविन ११६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, चिंताजनक असे कि दिवसभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाला. आजही सर्वाधिक २६० रुग्ण जळगाव शहरातून आढळले.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९९ हजार ४५६ इतकी झाली आहे. तर आज ११७६ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ९८९  वर गेली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७५८ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ७०९ रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २६०, जळगाव तालुका ४४, भुसावळ १८०, अमळनेर ७५; चोपडा १६३; पाचोरा ४४; भडगाव ३४; धरणगाव ६०; यावल ४७; एरंडोल ४१, जामनेर ७४; रावेर ३९, पारोळा ०५; चाळीसगाव ५१, मुक्ताईनगर ४४; बोदवड ०३ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे ११६७ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.