दिलासादायक ! देशात जवळपास 19 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 1409 ने वाढ झाली आहे, तर 388 कोरोनाचे रुग्ण बरेही झाले आहेत. तर जवळपास 19 टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. तर 681 लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 16 हजार 454 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 4257 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या 28 दिवसात तब्बल 12 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा 4 होता .

देशात लॉकडाऊन जाहीर होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात देशात जवळपास पाच लाख कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत केलेल्या पाच लाख टेस्टमध्ये जवळपास 21 हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसचा ट्रान्समिशन आणि डबलिंग रेट कमी करण्यात शासनाल यश आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कुणावर येऊन नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन लोक करतील. मात्र रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. आज देशात 736 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहे. या रुग्णालयामध्ये एकूण 1 लाख 94 हजार बेड्सची व्यवस्था आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.