जळगाव : आज जिल्ह्यात 13 बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ११ तालुके निरंक आहे.
आज जिल्ह्यात नविन १३ बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजार ५५१ वर पोचली आहे. तर दिसभरात ३४ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ७२० झाला आहे. गेल्या २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बळींची संख्या एक हजार ३४१ झाली आहे.
असे आढळले रुग्ण:-
जळगाव शहर ०३, जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०४, अमळनेर 00, चोपडा ०१ ,पाचोरा 02, भडगाव 0० ,धरणगाव 00, यावल ००, एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००, पारोळा ०२, चाळीसगांव ००, मुक्ताईनगर 00, बोदवड 00, इतर जिल्ह्यातील 00 असे १३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.