जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. रोजचे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक ही मालिका आजही कायम आहे. आज गुरुवारी प्राप्त अहवालात नवे ३० रुग्ण आढळून आले, तर ६७ रुग्ण बरे झाले. दरम्यान, आज जिल्ह्यातील आठ तालुके हे निरंक असल्याचे दिसून आले आहे. चोपडा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, रावेर, पारोळा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-३, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-३, धरणगाव-१, यावल-२, जामनेर-१४, बोदवड-५ असे एकुण ३० रूग्ण बाधित आढळले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ६९७ रूग्ण बाधित आढळून आले आहे. यापैकी ५१ हजार ९८१ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे आणि ४४२ रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकुण १ हजार २७४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९६.८० टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.