दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ४१० नवे रुग्ण, तर ७५६ कोरोनामुक्त

0

जळगाव : साधारण महिना- दीड महिना कोरोनाचा प्रसार जोरदार वाढल्‍यानंतर जिल्‍ह्‍यातील चित्र दिलासादायक झाले आहे. मागील गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या घटना दिसून येत असून त्यापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शुक्रवारी दिवसभरात ४१० नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात मृताचा आकडाही कमी होतानाचा असून येत आहे. गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. आजच्या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ५४६ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २६ हजार २८९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ८ हजार ७८८रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ०९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २४६९ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ४४, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ४७, अमळनेर १५, चोपडा ४७, पाचोरा ४, भडगाव ५, धरणगाव २, यावल १०, जामनेर १३, रावेर २०, पारोळा ९, चाळीसगाव ३९, मुक्ताईनगर ४०, बोदवड २९ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३५७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.